बाळासाहेब थोरातांना संगमनेरच्या बाहेर कोण ओळखत – विखे पाटील

vikhe patil and balasaheb thorat

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्यातील लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदान होत आहे, यामध्ये महाराष्ट्रातील १७ जागांसह देशभरातील ७२ जागांचा समावेश आहे, देशात आणखीन तीन टप्यातील मतदान बाकी असले तरी राज्यातील ४८ मतदारसंघातील मतदान आज पूर्ण होत आहे.

Loading...

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील राजकीय नाट्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. आज विखे पाटील यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान केले. यावेळी बोलताना शिर्डीत मतदारांचा कल शिवसेना उमेदवाराकडे असल्याचं सांगितले आहे.

सुजय आणि मी नेहमी एकत्र आहोत, नगर दक्षिणेत मी त्याच्या जाहीरपणे प्रचार केला, सुरुवातीला थोडासा संदेह होता मात्र आता माझी भूमिका जाहीर केली आहे. पुढील पंधरा दिवसांत राजकीय भूमिका देखील स्पष्ट करणार आहे, असं विखे पाटील म्हणाले.

दरम्यान, विखे यांनी यावेळी कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर देखील निशाणा साधला, थोरात यांना संगमनेर तालुका वगळता कोणी ओळखत नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे.

सकाळी ९ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी

ठाणे-5.98 %

पालघर-7.21 %

भिवंडी-5.92 %

कल्याण-4.28 %

मावळ-5.69%

शिरुर-6.33%

शिर्डी-7.43 %

दिंडोरी-5.69 %

नाशिक-5.21 %

नंदुरबार-7.13 %

धुळे- 6.07 %Loading…


Loading…

Loading...