विरोधात असताना ज्या गोष्टींवर टीका केल्या त्या गोष्टी आधी सुधारणार ; विखे

टीम महाराष्ट्र देशा :  काँग्रेस पक्षाचे चिंतन करण्याची वेळ केव्हाच निघुन गेल्याची खोचक टीका करुन राज्यात राजकीय पटलावर आश्चर्य कारक घटना घडतील अशा शब्दात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मधुन भाजपा त नेते येतील असे सुतोवाच राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. गृहनिर्माण मंञी राधाकृष्ण विखे पाटील यांनी तुळजापूर येथे देवीदर्शननंतर माध्यमांशी संवाद साधला.

गृहनिर्मण मंञी राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी तुळजापूर येथे सपत्नीक देवीदर्शन घेतले. देवदर्शनानंतर विखे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी भाजपात येण्याची अनेक लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांची इच्छा आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यातील राजकिय पटलावर अनेक आश्चर्य पाहायला मिळतील असे त्यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर प्रत्येकाने स्वता भुमिका घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हंटले.

याचबरोबर भाजपात येण्याआधी तुम्ही विरोधी पक्षात होता, त्यावेळी भाजपा अनेकवेळा टीकास्त्र सोडले, आणि आता तुम्ही स्वतः भाजपात आलात त्यामुळे टिका केलेल्या प्रश्ना बाबतीत काय भूमिका घेणार? असा प्रश्न त्यांना विचारला असता, टिका केलेल्या प्रश्न समस्या आता सोडवीन असे विखे यांनी म्हंटले.