भाजप प्रगत महाराष्ट्राला अधोगतीकडे घेवून जाण्याचे काम करत आहे – विखे पाटील

टीम महाराष्ट्र देशा: प्रगत महाराष्ट्राला अधोगतीकडे घेवून जाण्याचे काम भाजप सरकार करत असल्याची टीका विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. शेतकऱ्यांना देण्यात आलेली कर्जमाफी ऐतिहासिक असल्याच सरकार सांगत मात्र हि ऐतिहासिक फसवणूक असून सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. कर्जमाफीच्या घोळामुळे सरकारची बौद्धीक दिवाळखोरी दिसून आली आहे. त्यामुळे फसव्या कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणीही विखे पाटील यांनी केली आहे.

सत्तेत सहभागी असणारी शिवसेना सत्तेत राहून विरोध करत आहे. मात्र आता वाघाच्या डरकाळ्या कोणी ऐकत नसल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान सरकार विरोधात ३१ ऑक्टोबरपासून राज्यभरात आक्रोश मेळावे घेतले जाणार असल्याच त्यांनी सांगितल आहे.