सुजय-थोरातांच्या एकत्र विमान प्रवासावर राधाकृष्ण विखे म्हणतात…

radhakrishana vikhe patil

टीम महाराष्ट्र देशा : सुजय विखे आणि बाळासाहेब थोरात यांचा एकत्र एकाच विमानाने प्रवास हा योगायोग असून, यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. आमची भूमिका ठरलेली आहे. लोकसभेच्या दोन्ही जागा जशा आम्ही जिंकल्या, त्याच पध्दतीने नगर जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व जागा आम्ही जिंकू. असा विश्वास भाजप नेते आणि गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण पाटलांनी व्यक्त केला आहे.

Loading...

दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटलांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बाळासाहेब थोरात यांना शुभेच्छा दिल्या. तर विधानसभेत 230 जागांवर युतीचा विजय होईल अशी परिस्थिती असल्याचे सांगत, नवीन अध्यक्षांनी पक्षातील लोक कसे टिकून राहातील याची खबरदारी घ्यावी. असा सल्लाही विखेंनी थोरातांना दिला आहे.Loading…


Loading…

Loading...