कमला मिल कंपाऊंडमधील हॉटेल्सचे मालक हे ‘बाळराजें’चे जिवश्च कंटच्च मित्र- राधाकृष्ण विखे

टीम महाराष्ट्र देशा: मुंबईतील लोअर परेल भागातील कमला मिल कम्पाऊंडमध्ये मोजोस रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 14 जणांचा बळी गेला आहे. याठिकाणी असलेल्या बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या हॉटेल्सचे मालक हे ‘बाळराजें’चे जिवश्च कंटच्च मित्र आहेत. त्यांना या प्रकरणातून सुखरुप बाहेर काढण्यासाठी अधिकाऱ्यांचे निलंबन आणि बेकायदेशीर बांधकाम पाडण्याची तोंडदेखली कारवाई सुरु आहे. असा घणाघाती आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

ज्यांचे कमला मिलमध्ये पब आणि रेस्टारॅरंट आहे. त्या तिरुपती बिल्डरशी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी असलेल्या ‘बाळराजेंची’ आर्थिक भागीदारी आहेत. त्यांच्यासोबत एका माजी क्रिकेटपटूचीही आर्थिक भागीदारी आहे. हे बाळेराजे कोण याचा शोध घेतला पाहिजे अस देखील विखे-पाटील म्हणाले आहेत.