fbpx

महाआघाडीची संयुक्त पत्रकार परिषद मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांची दांडी

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक मोदी सरकार विरोधी पक्षांनी एकत्र येत भाजप विरुद्ध महाआघाडी केली आहे. राज्यात देखील कॉंग्रेस – राष्ट्रवादी आणि इतर छोट्या पक्षांनी एकत्र येत युती विरोधात महाआघाडी केली आहे. आज काँग्रेस-राष्ट्रवादीने संयुक्त पत्रकार परिषद घेवून महाआघाडीची घोषणा केली. मात्र या संयुक्त पत्रकार परिषदेला कॉंग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दांडी मारली आहे.

या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार ,जितेंद्र आव्हाड तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी हजर होते.

दरम्यान सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर विखे पाटलांच्या घरात दोन राष्ट्रीय पक्ष नांदू लागले आहेत. त्यामुळे विखे पाटील घराण नक्की कोणत्या राजकीय विचारसरणीचे आहे यावर आता प्रश्न निर्माण होत आहेत. त्यात राधाकृष्ण विखे पाटील हे आघाडीच्या अनेक कार्यक्रमांना गैरहजेरी लावत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.