मुंबई : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) व त्यांचे चिरंजीव उदयन गडाख (Udayan Gadakh) यांना जीवे ठार मारण्यासाठी कट रचल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियातून व्हायरल झाली आहे. दरम्यान, या मुद्द्यावर आता भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil) यांनी प्रतिक्रिया दिली असून यावरून त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की,‘रोज आपण जे चित्र पाहतोय त्यातून राज्यात कायद्याचा धाक उरलेला नाही हे अशा घटनातून स्पष्ट होते. विरोधकांकडून ‘गव्हरमेंट स्पॉन्सर’ हल्लेही झाल्याचे मुंबईच्या घटनेतून दिसत आहे. मुंबईचा प्रकार पाहिला तर तेथे शिवसेनेचे कार्यकर्ते पोलिसांच्या संरक्षणात हल्ले करतात.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘अंडरवल्डशी संबंधित असलेले नवाब मलिक यांच्या विरोधात पुरावे मिळूनही त्यांचे मंत्रीपद कायम ठेवले जाते. मग गुंडांचे बळ वाढणारच. शंकरराव गडाख हे महाविकास आघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांच्या स्वीय सहाय्यकावर गोळीबार होतो. आज त्यांना स्वतः धमक्या यायला लागल्या आहेत’, असेही विखे पाटील यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- “पिढ्या बदलत गेल्या, मनोरंजनाची नवनवीन साधनं आली तरी…”, अमोल कोल्हे यांनी शेअर केला व्हिडिओ
- “आम्हाला आमच्या हक्काचे पैसे…”; आव्हाडांची मोदींना तिखट प्रतिक्रिया
- इंधनाच्या करावरून केंद्र-राज्यात तिढा, अजित पवारांनी सुचवला ‘हा’ तोडगा
- “बुळबुळीत टोमणे मारण्याचे पेटंट फक्त मुख्यमंत्र्यांकडे”, राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्याला भातखळकरांचे प्रत्युत्तर
- पुरंदरेंचे समर्थन करणारा महाराष्ट्राचा शत्रू, शिवद्रोही असू शकतो – इतिहास संशोधक कोकाटे