राधाकृष्ण विखे – पाटील यांच्यावर कारवाई होत नाही ; तोपर्यंत आमची नाराजी कायम : शिवाजी कर्डिले

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात पराभवाला जबाबदार असणाऱ्या आमदार राधाकृष्ण विखे – पाटील यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आमची नाराजी कायम राहिल, असं मत भाजप नेते आणि माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी व्यक्त केलं आहे.

ते अहमदनगर येथील एका खासगी कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कारवाई होईल, अशी आशाही व्यक्त केली. भाजपचे वरिष्ठ नेते याबाबत आपल्याला भेटून गेल्याचंही कर्डिलेंनी नमूद केलं आहे.

Loading...

अहमदनगरमध्ये भाजपच्या झालेल्या पराभवाला काँग्रेसमधून आलेले माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील जबाबदार आहेत. ते ज्या पक्षात जातात, तिथं खोड्या करतात. त्या पक्षासाठी नुक्संकरण वातावरण निर्माण करतात,’ असा आरोप कर्जत-जामखेडचे भाजपचे पराभूत उमेदवार राम शिंदे यांनी केला होता.

नगरमध्ये भाजपचे पूर्वीचे पाच आमदार असताना विखे आणि पिचड आल्यानंतर ती संख्या सातवर गेली. त्यात आणखी वाढ होणं अपेक्षित होतं. पण निवडणुकीनंतर ती तीनपर्यंतच मर्यादित राहिली. विखे यांना नगरमध्ये यांना नगरमध्ये ताकदीचा काहीही फायदा झालेला नाही. उलट अनेकांचा सूर त्यांच्या विरोधात आहे. ते जिथं जातात, तिथं वातावरण बिघडवतात.’ असा आरोपही शिंदे यांनी केला होता.यामध्ये शिवाजीराव कर्डिले यांनीही शिंदेंच्या सुरात – सूर मिसळत नगर जिल्ह्यात झालेल्या भाजपच्या पराभवास राधाकृष्ण विखे यांना जबाबदार धरल होत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
'१४ एप्रिलनंतर महानगरं आणि बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागातील लॉक डाऊन उठवावे'
आमदार साहेब गोरगरिबांच्या अन्नात माती कालवू नका, राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद आला चव्हाट्यावर
संतापजनक : तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझा सलाम ; या दिग्गज कलाकाराने केलं कौतुक
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका