fbpx

विखे पाटलांना मानाचे पान ; शपथविधी सोहळ्याची सुरुवात राधाकृष्ण विखे पाटलांपासून

मुंबई : शिवसेना-भाजपचे सूर पुन्हा जुळल्यापासून चर्चेत असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे.राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार सुरु झाला असून पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना देण्यात आला आहे. तर शिवसेनेच्या जयदत्त क्षीरसागर यांना दुसरा मान देण्यात आला.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. या फेरबदलात आठ मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे. आज एकूण 13 जणांचा शपथविधी संपन्न होईल. यामध्ये विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचादेखील समावेश आहे. सोमवारपासून विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरू होत आहे.

live updates

संजय कुटे यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
आशिष शेलार यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
जयदत्त क्षीरसागर यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली
केंद्रीय मंत्री रामदास आठवले, रावसाहेब दानवे हे देखील शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित
शिवसेना आणि भाजपचे इतर आमदारही राजभवनात पोहोचायला लागले