कोळसे पाटलांच्या व्याख्यानामुळे फर्ग्युसनमध्ये राडा

पुणे : भारतीय संविधान या विषयावर बोलण्यासाठी फर्ग्युसन महाविद्यालयाने माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांना दिलेले निमंत्रण अचानक रद्द केल्याने महाविद्यालयाच्या परिसरात गोंधळातच त्यांचे व्याख्यान पार पडले. यावेळी महाविद्यालय प्रशासनाविरोधात घोषणा देण्यात आल्या.

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्मावी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त माजी न्यायमूर्ती बी.जे. काेळसे पाटील आणि अमाेल मिटकरी यांच्या कार्यक्रमाचे फर्ग्युसन महाविद्यालयात आयाेजन केले हाेते. आज बी.जे.काेळसे पाटील यांचे व्याख्यान दुपारी12 वाजता फर्ग्युसन महाविद्यालयातील अँफी थिएटर मध्ये आयाेजित करण्यात आले हाेते. काेळसे पाटील भारतीय राज्यघटना या विषयावर व्याख्यान देणार हाेते. परंतु शनिवारी अचानक या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याने विद्यार्थी संघटना आता आक्रमक झाल्या .

दरम्यान, बी. जी. कोळसे पाटील महाविद्यालयात दाखल झाले त्यावेळी  विद्यार्थ्यांच्या दोन्ही गटांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने काही काळ गोंधळाची स्थिती झाली होती. विद्यार्थ्यांच्या एका गटाच्या कोळसे पाटील मुर्दाबादच्या घोषणा दिल्या तर त्यांना प्रत्यूत्तर म्हणून दुसऱ्या गटाच्या कोळसे पाटील समर्थनार्थ घोषणा दिल्या.