वंशवाद ट्विट वरून बिग बी झाले ट्रोल

bigg bi

मुंबई : क्रिकेटर विराट आणि अभिनेत्री अनुष्काला मुलगी झाल्यानंतर त्यांच्या वरती कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच ‘बिग बींनी एक ट्विट केले आहे. बिग बींनी केलेल्या ट्विट मध्ये आता पर्यंत किती क्रिकेटपटूंना मुलगी याची लिस्ट शेअर केली आहे, आणि धोनीची मुलगी या टीमची कॅप्टन असेच असे ट्विट बिग बींनी केले आहे. बिग बींचे हे ट्विट प्रचंड व्हायरल होत आहे. बिग बींच्या या ट्विटवर कंमेंटचा वर्षाव होत आहे.

महेंद्र सिंह धोनी, हरभजन सिंह, नटराजन, उमेश यादव, मोहम्मद शमी, आर अश्विन, रोहित शर्मा, गौतम गंभीर, सुरेश रैना, ऋद्धिमान साह, रविंद्र जडेजा, अजिंक्य रहाणे या १२ क्रिकेटर्सची नावे आहेत. या १२ क्रिकेटर्सना मुली आहेत. ‘तुमच्या मुलीही क्रिकेट टिमच्या कप्तान होणार का ?’ असे म्हणत बिग बींनी एक पोस्ट शेअर केली आहे.अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रश्न उपस्थित करत त्यांना ट्रोल केले आहे. ‘आता क्रिकेटमध्येही वंशवाद होणार का?’, असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

‘ही राष्ट्रिय क्रिकेट टीम आहे. इथे महिला आणि पुरूषांचीच्या टिमचे सिलेक्शन त्यांच्या कुवतीनुसारचं केले जाईल. त्यांच्या आई वडिलांचा यात काही श्रेय नसावे. बॉलिवूडमध्ये सुरू असलेला वंशवाद क्रिकेटमध्ये आणण्याचा प्रयत्न करू नका’, अशी टिका नेटकऱ्यांनी केली आहे. काही नेटकऱ्यांनी बिग बींची बाजू घेतलेली पहायला मिळता आहे. ‘कधी कधी काही गोष्टी या गंमतीशीरित्याही घेतल्या पाहिजेत’, असेही नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या