VIDEO- सलमान खानचा बहुप्रतीक्षित ‘रेस 3’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

वेब टीम- बॉलिवूडचा भाई अर्थात सलमान खान याच्या बहुप्रतीक्षित चित्रपट ‘रेस 3’चा ट्रेलर अखेर रिलीज झाला असून ‘रेस 3’चा ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. रेस 3 चित्रपट 15 जून रोजी ईद च्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. सलमानचा कोणताही सिनेमा म्हटल की चित्रीकरणाच्या पहिल्या दिवसापासून ते सिनेमा प्रदर्शित होईपर्यंत वेगवेगळ्या चर्चांना उधाण येते.

‘रेस ३’ या सिनेमात जॅकलिन फर्नांडिस, अनिल कपूर, डेजी शहा आणि बॉबी देओल यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. यावर्षी ईदला हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसूझा करत असून, रमेश तौरानी आणि सलमान खानने या चित्रपटाची  निर्मिती केली आहे. या चित्रपटात सलमानसोबत अनिल कपूर, बॉबी देओल, जॅकलिन फर्नांडीस, डेजी शहा आणि साकिब सलीम हे देखील दिसणार आहे. सलमान यात पहिल्यांदाच ग्रे शेड असणारी भूमिका साकारताना दिसणार आहे अशीही चर्चा आहे. त्यामुळे सलमानच्या या भूमिकेबद्दल त्याच्या चाहत्यांना देखील कुतूहल आहे.

 

You might also like
Comments
Loading...