बेहिशोबी मालमत्ता प्रकरण : राबडीदेवी, तेजस्वी यादवच्या विरोधात आरोपपत्र दाखल होणार

rabdidevi tejaswi yadav

नवी दिल्ली : बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांची पत्नी राबडी देवी आणि मुलगा तेजस्वी यादव यांच्याविरूद्ध दिल्लीतील एका न्यायालयात आरोपपत्र दाखल केले जाणार आहे. लालू प्रसाद यांची कन्या मीसा भारती यांच्याविरूद्धही आरोपपत्र दाखल करण्याची तयारी सुरू असल्याचे समजते. दुसरीकडे, बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी लालू यांचे जावई शैलेश यांचीही चौकशी सुरू आहे. बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी लालू आणि त्यांचे कुटुंब सक्तवसुली संचालनालयाच्या रडारवर आहे.  केंद्रीय अन्वेषण विभागाने काही दिवसांपूर्वीच राबडी देवी यांच्या ठिकाणांवर छापा टाकला होता. याचबरोबर सक्तवसुली संचालनालयाने भारती यांच्या दिल्लीतील तीन ठिकाणांवर छापा टाकला होता. या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे .