टागोरांनी नोबेल परत केला होता; बिप्लब देब याचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली – आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायमच चर्चेत असणारे बिप्लब देब यांनी आज पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटीशांना विरोध दर्शवण्यासाठी आपला नोबेल पुरस्कार परत केला होता असं वक्तव्य बिप्लब देब यांनी केलं आहे. बिप्लब देब यांचा वक्तव्य केल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उदयपूर येथे रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

Loading...

या व्हिडिओमध्ये बिप्लब देब यांनी म्हंटल आहे की, रवींद्रनाथ टागोर यांना ४ नोव्हेंबर १९१३ रोजी नोबेल पुरस्कार गीतांजली या रचनेसाठी प्रदान करण्यात आला होता. १९१५ साली त्यांना ब्रिटिश सरकारने “सर” ही पदवी दिली. १९१९ च्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर त्यांनी ती सरकारला परत केली.दरम्यान बिप्लब देब नेहमीच करत असलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजप सरकार अडचणीत आले असून, बिप्लब देब सातत्याने करत असलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे विरोधक भाजपवर टीकेची झोड उठवत आहेत.

गेल्याच महिन्यात त्यांनी महाभारताच्या काळापासून इंटरनेट आणि सॅटेलाइट सेवा उपलब्ध असल्याचा जावईशोध लावला होता. आपल्या या वक्तव्यावर त्यांनी कोणतं स्पष्टीकरणही दिलं नव्हतं.यानंतर त्यांनी मिस वर्ल्ड डायना हेडनचाही अपमान केला होता. सौंदर्य स्पर्धा बोगस असून, २१ वर्षांपूर्वी डायना हेडन विश्वसुंदरी झालीच कशी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. अभिनेत्री ऐश्वर्या राय ही खऱ्या अर्थानं भारतीय महिलांचं प्रतिनिधीत्व करते. आम्ही महिलांना लक्ष्मी, सरस्वतीप्रमाणं देवी मानतो. ती विश्वसुंदरी झाली. पण डायना हेडन विश्वसुंदरी झालीच कशी असा सवाल त्यांनी विचारला होता. ज्यानंतर त्यांना माफीही मागावी लागली.

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...