हद्द झाली… आता जनता मूर्ख बनणार नाही,राबडी देवींचा टोमणा

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शनिवार) सकाळी केदारनाथ मंदिरात पूजा-अर्चना केली. त्यानंतर त्यांनी ध्यानसाधना सुद्धा केली आहे.साधूच्या वेशामध्ये मोदी ध्यानस्थ बसले होते. तब्बल दोन महिने प्रचार केलेले पंतप्रधान मोदी चित्त शांती आणि आत्मशांतीसाठी आज ध्यानस्थ झालेले पहायला मिळाले.यावेळी मोदींनी खास गढवाली वस्रे परिधान केली होती.यावेळी त्यांनी भाजपच्या विजयासाठी केदारनाथाला साकडंही घातलं.

मोदींनी सोशल मीडियावर यासंदर्भातील फोटो पोस्ट केल्यानंतर आता विरोधकांकडून मोदींना लक्ष्य केलं जाऊ लागले आहे. आता जनता मूर्ख बनणार नाही, असा टोमणा बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी मोदींना मारला आहे. देव स्वत: तुम्हाला भेटायला आले असते. तुम्हाला त्यांच्याकडे जाण्याची गरज नव्हती, असं म्हणत राबडींनी मोदींवर सडकून टीका केली आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.