शिवराज्याभिषेकासाठी देवीच्या चरणाचे कुंकु, कवड्यांचा माळा व साडीचोळी तुळजापूरकरांकडून रायगडी !

shirajyabhishek

तुळजापूर – छञपती शिवाजी महाराजांचा सहा जुन 2020रोजी रायगडावर होणाऱ्या शिवराज्यअभिषेक सोहळ्यासाठी तिर्थक्षेञ तुळजापूरकरांचा वतीने रायगड वरील छञपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यास लावण्यासाठी देवीच्या चरणाचे कुंकु व सदरेवरील राजांना घालण्यासाठी 108 देविच्या अबुंकि कवड्याची माळ व शिरकाई देवीसाठी साडीचोळी हे साहित्य छञपती संभाजी महाराजांन कडे रवाना करण्यात आले.

छञपती शिवाजी महाराजांचा घराण्याचे कुलदैवत श्रीतुळजाभवानी असुन देवीच्या बरोबर चांदी सिंहासनावर बसण्याचा जगातील ऐकमेव राजा छञपती शिवाजी महाराजांना मान असुन नवरात्सोवात भवानी तलवार सिंहासनावर विशेष महाअलंकार मांडण्यात येते हे विशेष आहे.

छञपती शिवाजी महाराजांचा रायगडी होणाऱ्या शिवराज्य अभिषेक सोहळ्यासाठी दरवर्षी नित्यनियमाने श्रीतुळजाभवानी चरणी लावलेले कुंकु व देविची 108कवड्यांची माळ तुळजापूरातील शिवप्रेमी रायगडी नेत असत परंतु यंदा कोरोना पार्श्वभूमीवर ते अशक्य असल्याने देवीच्या वारा दिवशी मंगळवार दि 1 श्रीतुळजाभवानी चरणी कुंकु व 108 कवड्याची माळ लावुन रवाना करण्यात आले.

यंदा प्रथमच श्रीतुळजाभवानी दारातुन राययडावरील शिर्काई देवीसाडी साडीचोळी कुंकु ओटीचे साहित्य कुंकु 108 अबुंक्या कवड्याचा सहा माळा ज्या की रायगडी सदरेवरील छञपती शिवाजी महाराजा पुतळ्यास शिवराज्य अभिषेक सोहळ्या वेळी घालण्यासाठी खास बनवलेली अबुंकी कवड्याची माळ तसेच राज सदरेवरील जगदेश्वर व शिर्काई देवी छञपती शिवाजी महाराजांचा समाधीसठी तसेच होळीवरील छञपती शिवाजी महाराज पुतळा व पालखी सोहळ्यातील शिवाजी महाराज पुतळ्यास घालण्यासाठी सहा माळा ऐका बाँक्स मधुन छञपती संभाजी राजेचे सचिव योगेश केदार यांच्या कडे शिवप्रेमी सतिश खोपडे सर, महेश शिंदे, साईराज खोपडे, शेखर फुगारे यांनी विनभ्र पुर्वक दिले व योगेश केदार हे रायगडी रवाना झाले.

विशेष म्हणजे गडदेवता शिर्काई देवीला साडीचोळी अर्पण करण्याचा मान प्रथमच तिर्थक्षेञ तुळजापूरला छञपती संभाजी राजे व राणी संयोगिता राजे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत हेमंत साळोखे महेश पाटील यांनी तुळजापूरला दिला. यापुर्वी तिर्थक्षेञ तुळजापूरहुन देवीचा चरणाला लावलेले कुंकु व 108 अबुंकी कवड्याची माळ शिवप्रेमी अभियंते अण्णासाहेब विश्वनाथ बळवंते देत असत. त्यांच्या अपघाती निधनानंतर आता ही जबाबदारी तुळजापूरकरांनी स्विकारली आहे.

ऑनलाईन व डिजिटल शिक्षणाचे पर्याय मोठ्या प्रमाणावर वापरा,मुख्यमंत्र्यांची शिक्षण विभागाला सूचना

पुण्यातून बाहेर किंवा पुण्यात येण्यासाठी पास लागणार का ? वाचा ही महत्वाची बातमी

पुण्यात पहिल्यांदा 12 गणेश मंडळांनी एकत्रित साजरी केली शिवजयंती