आर जे मलिष्काने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

r j malishka meets devendra fadanvis

मुंबई : ‘मुंबई तुला बीएमसी वर भरोसा नाय का’ हे गाण गायल्याने शिवसेनेकडून आर जे मलिष्काला चांगलच टार्गेट करण्यात येत आहे. अशातच आता मलिष्काने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटी बाबद मलिष्काने ट्विटरवरुन माहिती दिली आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत या गाण्यावरून चर्चा झाली तसेच गाण्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रोत्साहन दिल असल्याचही मलिष्काने सांगितल आहे.

‘मुंबई तुला बीएमसी वर भरोसा नाय का’ या गाण्यामधून मलिष्काने मुंबईतील रस्त्यांवरील खड्यांची पोलखोल केली होती. या गाण्यामुळे बीएमसीची बदनामी झाल्याच कारण देत मलिष्कावर ५०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची देखील तयारी करण्यात आली होती. मात्र मुंबईकरांसह अनेक नेत्यांनी मलिष्काला पाठिबा दिला होता. आता तिने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येणार हे पाहावं लागणार आहे.