अहमदनगर दुहेरी हत्याकांड : राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप पोलिसांच्या ताब्यात

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेचे अहमदनगर उपशहरप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे या दोघांच्या हत्येप्रकरणी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास आमदार संग्राम जगताप यांना ताब्यात घेतले असून भानुदास कोतकर आणि बाळासाहेब कोतकर या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. आमदार अरुण जगताप आणि भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह ३० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी उघड झालेल्या या हत्या प्रकरणातील आरोपी संदीप गुंजाळ रात्री सव्वा आठच्या सुमारास पारनेर पोलीस स्थानकात स्वत:हून हजर झाला होता.

शनिवारी सायंकाळी सहा वाजता केडगाव येथील सुवर्भण नगर येथे भर चौकात संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संतप्त शिवसैनिकांनी सुवर्णनगर येथे दगडफेक करत वाहनांची तोडफोड केली. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर संतप्त जमावाने पोलीस वाहनांवरही दगडफेक केली. हल्लेखोरानी रिव्हॉलव्हरमधून गोळीबार केला होता.

1 Comment

Click here to post a comment