आर अश्विनचा राडा, जगातील सर्वोत्तम गोलंदाजांना ठरला वरचढ

टीम महाराष्ट्र देशा : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील आज(6 ऑक्टोबर) पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. आज अश्विनने सुरुवातीलाच दक्षिण आफ्रिकेच्या थेनुस डी ब्रूनची विकेट घेत भारताला शानदार सुरुवात दिली. या विकेटबरोबरच त्याने एका मोठया विश्वविक्रमाची बरोबरीही केली आहे.

अश्विनने या सामन्यात कसोटी कारकिर्दीत 350 विकेट्स घेण्याचा टप्पा पार केला आहे. थेनुस डी ब्रून हा आर अश्विनची 350 वी विकेट ठरला आहे. विशेष म्हणजे अश्विनने हा मोठा टप्पा 66 कसोटी सामन्यात पूर्ण केला आहे.

त्यामुळे त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 350 विकेट्स घेण्याच्या मुथय्या मुरलीधरनच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. मुरलीधरननेही 66 कसोटी सामन्यात 350 कसोटी विकेट्सचा टप्पा पार केला होता.

तसेच भारताकडून याआधी आत्तापर्यंत कसोटीमध्ये 350 कसोटी विकेट्सचा टप्पा केवळ अनिल कुंबळे, कपिल देव आणि हरभजन सिंग यांनी पार केला आहे. त्यामुळे अश्विन हा टप्पा पार करणारा केवळ चौथा भारतीय ठरला आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 350 विकेट्स घेणारे गोलंदाज

66 सामने – आर अश्विन

66 सामने – मुथय्या मुरलीधरन

69 सामने – रिचर्ड हॅडली

69 सामने – डेल स्टेन

महत्वाच्या बातम्या