fbpx

आपली संस्कृती ‘अतिथि देवो भव’ची; ऑस्ट्रेलियन टीम बसवरील दगडफेकीवर अश्विन संतापला

stone pelting on asutralian cricekat team

टीम महाराष्ट्र देशा: गुवाहटी मध्ये भारत –ऑस्ट्रेलिया दरम्यान झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यानंतर ऑस्ट्रेलियन टीम हॉटेल मध्ये परत जात असताना टीमच्या बस वर दगडफेक झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर फिरकीपटू आर.अश्विन चांगलाच संतापला असून दगडफेक करणाऱ्या चाहत्यांना आपण अशा देशात राहतो, ज्याची संस्कृती ‘अतिथि देवो भव’ आहे, याची आठवण करून दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला आसामचे मुख्यमंत्री सोनोवाल यांनी या घटनेची उच्च स्तरीय चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत

ऑस्ट्रेलियन फलंदाज एरॉन फिंच याने ट्विट करून दगडफेकीबाबतची माहिती दिली होती. त्या ट्विटमध्ये “हॉटेल मध्ये जाताना बसवर दगड फेकला गेला.हे खूप भयावह होते.”असं म्हटलं होतं त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. या दगडफेकीनंतर सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.अश्विनने देखील याबाबत ट्विट करून नाराजी व्यक्त केली तसेच आपण ज्या देशात राहतो त्या देशात अतिथी देवो भव अशी संस्कृती असल्याचं त्याने म्हटले आहे.दरम्यान आसामचे मुख्यमंत्री सर्वोनंद सोनोवाल यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे त्याच बरोबर या घटनेची उच्च स्तरीय चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.दगडफेक करणाऱ्या दोन संशयीत आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

 

4 Comments

Click here to post a comment