विराट कोहलीच्या श्रीलंकेविरुद्ध वनडेत २००० धावा

quickest-to-2000-odi-runs-against-an-opposition/

विराट कोहलीने आज श्रीलंकेविरुद्ध जबदस्त अर्धशतकी खेळी केली. जेव्हा हा खेळाडू ५५ धावांवर पोहचला तेव्हा त्याने लंकेविरुद्ध वनडेमध्ये २००० धावांचा टप्पा पार केला.

कोहलीने वनडे प्रकारात कोणत्याही संघाविरुद्ध प्रथमच २००० धावा केल्या आहेत. भारताकडून यापूर्वी श्रीलंकेविरुद्ध सचिन(३११३) आणि धोनी(२२६१) या दोन खेळाडूंनी २००० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

कोणत्याही संघाविरुद्ध वेगवान वनडे २००० धावा करण्याचा विक्रम हा सचिनच्या नावावर आहे. सचिनने हा विक्रम ऑस्ट्रेलिया विरुद्ध ४० डावात केला होता. कोहलीला हा विक्रम करण्यासाठी ४१ सामने लागले. तो सध्या व्हिव्हियन रिचर्डसह संयुक्त दुसऱ्या स्थानी आहे.

श्रीलंकेविरुद्ध २००० धावा करणारे भारतीय खेळाडू
३११३- सचिन तेंडुलकर
२२६१- एमएस धोनी
२०००- विराट कोहली

कोणत्याही संघाविरुद्ध कमी डावात २००० धावा करणारे खेळाडू
४०- सचिन तेंडुलकर- वि. ऑस्ट्रेलिया
४४- विराट कोहली- वि. श्रीलंका
४४-व्हिव्हियन रिचर्ड- वि. ऑस्ट्रेलिया
४५- एमएस धोनी- श्रीलंका