‘मुख्यमंत्र्यांना आपला मंत्री धुतल्या तांदळाचा वाटत असेल तर पूजा चव्हाण प्रकरणाची सीबीआय चौकशी करा’

मुंबई : ‘मी ओबीसीचे नेतृत्व करणारा सामान्य कार्यकर्ता आहे. माझ आयुष्य उध्वस्त करण्याचा हा प्रयत्न आहे’, असा आरोप संजय राठोड यांनी केला आहे.

दरम्यान, या सर्व प्रकरणावर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी भाष्य केले आहे. ‘संजय राठोड यांचे स्पष्टीकरण थोतांड आहे. मुख्यमंत्र्यांना जर आपला मंत्री धुतल्या तांदळाचा आहे, असे वाटत असेल तर या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी. निपक्षपणे चौकशी करा म्हणजे दुध का दुध पाणी का पाणी होईल’, असे लाड म्हणाले.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आरोप झाल्यानंतर वनमंत्री संजय राठोड जनतेसमोर कधी येतात याची प्रतीक्षा सर्वांनाच लागली होती. मात्र, आज प्रतीक्षा संपली आहे. दोन आठवड्यांहून अधिक काळानंतर संजय राठोड हे माध्यमांसमोर आले होते. पोहरादेवी व संत सेवालाल महाराज यांचे दर्शन घेतल्यानंतर राज्य राठोड काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं होतं. दोन आठवड्यांहून अधिक काळानंतर संजय राठोड हे माध्यमांसमोर आले असून त्यांची पत्रकार परिषद घेऊन गेल्या काही दिवसांपासून होणारे आरोप फेटाळून लावले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या