राहुल गांधी यांच नागरिकत्व कोणतं… ब्रिटीश की भारतीय ?

टीम महाराष्ट्र देशा : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेत्यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे भारतीय नागरिक आहेत की ब्रिटिश नागरिक असा प्रश्न भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी उपस्थित केला आहे. उमेदवारी अर्ज भरताना राहुल गांधींकडून जी कागदपत्रे जोडण्यात आली आहेत त्यातून राहुल यांच्या नागरिकत्वाचा घोळ झाला आहे.

जीव्हीएल नरसिम्हा यांनी पत्रकार परिषदेत घेत याबाबतचा खुलासा केला आहे. यावेळी नरसिम्हा म्हणाले की, राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे त्यात ते ब्रिटिश नागरिक होते असल्याचं सांगितलं गेलंय. उमेदवारी अर्ज भरताना राहुल गांधींकडून जी कागदपत्रे जोडण्यात आली आहेत त्यातून हे समोर आलेलं आहे. तर अमेठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जावर सुनावणीसाठी सोमवारपर्यंत वेळ दिला आहे.

तसेच काही अपक्ष उमेदवारांनी राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला आहे. तर राहुल हे ब्रिटीश नागरिक असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यावर राहुल यांची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र राहुल गांधी यांच्या वकिलांनी राहुल हे भारतीय नागरिक आहेत की नाही यावर निवडणूक आयोगाकडे वेळ मागितला आहे. राहुल यांच्या नागरिकत्वावर शंका निर्माण होऊ लागली आहे.Loading…
Loading...