fbpx

वेगळे पक्ष असणारे खोत, जानकर, मेटे भाजप आमदार कसे ?

sadabhau khot, vinayak mete and mahadeo jankar

मुंबई: राज्यमंत्री सदाभाऊ खोत महादेव जानकर, आणि आमदार विनायक मेटे हे यांचे स्वतंत्र पक्ष आहेत. तरी ते सभागृहात भाजपचे सदस्य आहेत हे कसे? यांच्या सदस्यत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. तसेच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सुद्धा हे मंत्री आणि आमदार ज्या पक्षाचे अध्यक्ष आहेत त्या पक्षाचे सदस्य अथवा आमदार नाहीत तर ते भाजपचे सदस्य आहेत. त्यांचे काय करणार, असा प्रश्न सभागृहात उपस्थित केला.

स्वतंत्र राजकीय पक्ष म्हणून निवडणूक आयोगाकडे नोंदणी असणाऱ्या या नेत्यांना त्यांना विधान परिषदेत बसता येणार नाही. हा घटनात्मक पेच असून त्यांच्या सदस्यत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. यावर सभापती रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, याप्रश्नी विधान मंडळाचे अधिकारी, निवडणूक आयोगाचे अधिकारी यांच्याशी चर्चा करू, गरज भासल्यास ऍडव्होकेट जनरलचा सल्ला घेऊन निर्णय देऊ.

नेमकं काय आहे प्रकरण?

कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष होते. आमदार विनायक मेटे हे शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आहेत. आणि पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर हे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांचे पक्ष हे निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत पक्ष आहेत, परंतु सभागृहात ते भाजपचे सदस्य आहेत हे कसे? निवडणूक आयोग आणि हे घटनेचे उल्लंघन असून त्यांना असे राहता येणार नाही.

1 Comment

Click here to post a comment