fbpx

मोदीजी… शहीदांच्या नावावर मते मागता आणि शहीदांचा अपमान करणाऱ्यांना तिकीट देता ?

narendra modi sad

टीम महाराष्ट्र देशा : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी राहिलेल्या आणि सध्या मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभेच्या जागेवरील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मुंबई हल्ल्यातील शहीद एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्याबाबतीत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर ही हेमंत करकरे विषयी बोलताना म्हणाल्या की, मी हेमंत करकरे यांना तुझा सर्वनाश होईल असा शाप दिला होता आणि २१ दिवसातच मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. असे तथ्यहीन वक्तव्य केल्याने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या वर टीका होत आहे.

खासदार संजय सिंह यांनी देखील आपल्या खास शैलीत साध्वीच्या संतापजनक वक्तव्याचा समाचार घेतला आहे. शहीद हेमंत करकरे यांच्या शौर्याचा अपमान करणाऱ्या प्रज्ञा ठाकूर भाजपच्या उमेदवार आहेत. आता मोदीजी कुठे आहेत? शहीदांच्या नावावर मते मागतात आणि शहीदांचा अपमान करणाऱ्यांना तिकीट देतात अशी टीका खासदार संजय सिंह यांनी केली आहे.

काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी साध्वी आणि भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरेंना देशद्रोही घोषित करण्याचा गुन्हा फक्त भाजपचे लोकचं करु शकतात. जो दहशतवाद्यांशी लढताना भारत मातेसाठी प्राण अर्पण करतो. त्याच्याबद्दलचे असे वक्तव्य हा देशातील प्रत्येक सैनिकाचा अपमान आहे. यासाठी प्रज्ञा ठाकूर यांच्यावर कारवाई करत भाजपने देशाची माफी मागावी अशी मागणी सुरजेवाला यांनी केली .