अभिजित बिचुकलेबाबत आदित्य ठाकरेंना विचारला प्रश्न, ते म्हणाले…

टीम महाराष्ट्र देशा : ठाकरे घराण्यातील पहिले ठाकरे म्हणजे शिवसेनेचे युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे हे प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे शिवसेनेसाठी ही विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर त्यांना टक्कर देण्यासाठी बिग बॉस फेम अभिजित बिचुकले हे देखील वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

याबाबत आदित्य ठाकरे यांना विचारले असता. त्यांनी उत्तर देण टाळले आहे. मी कधीही समोरच्या उमेदवारावर बोलत नाही. मी शिवसेना आणि शिवसैनिकानी केलेलं काम याच्यावरच बोलत असल्याचे सांगत अभिजीत बिचुकले यांच्यावर बोलणे आदित्य ठाकरे यांनी टाळले आहे.

दरम्यान वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. वरळी हा शिवसेनेचा घरचा मतदारसंघ असल्याने आदित्य ठाकरे यांना ही निवडणूक काहीशी सोपी जाणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र असे असले तरी आदित्य ठाकरे यांना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरेश माने यांना मैदानात उतरविले आहे. त्यातच बिग बॅास फेम व साताऱ्याचे सामाजिक कार्यकर्ते अभिजीत बिचुकले यांनीही आदित्य ठाकरे यांच्या विरोधात दंड थोपटले आहे.

अभिजित बिचुकलेंना आदित्य ठाकरेंबाबत विचारले असता

आदित्य हा माझ्यासाठी युवराज वगैरे कुणीही नाही. छत्रपती उदयनराजेंना मी आव्हान देतो, तर छत्रपतींची प्रतिमा वापरुन हे मोठे झालेले आहेत. छत्रपतींच्या 13 व्या वंशजांना मी गेल्या 20 वर्षांपासून विरोध केलाय. त्यामुळे आदित्यला मी किरकोळ बाब समजतो.

महत्वाच्या बातम्या