fbpx

‘गणेशोत्सवाचे जनक कोण’? वादात या बड्या कॉंग्रेस नेत्याची उडी

mayour mukt tilak & bhau rangari ganpati conflict

पुणे : गणेशोत्सवाचे जनक कोण, यावरून पुण्यातील वाद टोकाला गेला असून भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टने आक्रमक भूमिका घेतली आहे.भाऊसाहेब रंगारी हे सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक आहेत २० आॅगस्ट पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. दुसरीकडे कॉंग्रेस नेते आ.नितेश राणे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यात येणार असल्याने हे प्रकरण आता राजकीय वळण घेणार हे स्पष्ट झाल आहे .

मागील बऱ्याच दिवसांपासून पुण्यात गणेशोत्सवाचे जनक कोण, यावरून वाद सुरु आहे.भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टने आता आक्रमक भूमिका घेतली आहे.भाऊसाहेब रंगारी हे सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक आहेत हे मान्य करावे यासाठी न्यायालयीन मार्गासोबतचआता २० आॅगस्ट पासून बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे . कॉंग्रेस नेते आ.नितेश राणे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यात येणार आहेत त्यामुळे आगामी काळात या प्रश्नावर राजकारण होणार हे स्पष्ट झाल आहे,

दरम्यान, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ३५० गणेशोत्सव मंडळांनी त्यांच्या मंडपात रंगारी यांचे छायाचित्र लावण्याचे मान्य केले आहे. तशी पत्रे त्यांनी दिली आहेत. शहरातील अनेक मंडळांनी संमतीपत्र दिले आहे. गणेशोत्सवाचे हे १२५ वे वर्ष नसून १२६ वे आहे. हे सुद्धा महापालिका अमान्य करीत आहे. न्यायालयात हे सिद्ध करण्यासाठी पुरावे देणार आहोत, अशी माहिती भाऊसाहेब रंगारी मंडळाचे विश्वस्त अनंत कुसुरकर यांनी दिली आहे.