प्यार प्यार करते..गाण्यावर रश्मीले केला डान्स; थ्रोबॅक व्हिडीओला पसंती

rashmi

मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘उतरन’ या मालिकेतून सर्व परिचित झालेली रश्मी देसाई ही कमी कालावधीतच लोकप्रिय झाली. मात्र ती जशी रश्मी अप्रतिम अभिनेत्री तशीच एक उत्तम डान्सर देखील आहेत.नुकताच रश्मीचा एक थ्रोबॅक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान रश्मीच्या एका डान्स परफॉर्मेंसचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत रश्मी अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या ‘जुदाई’ चित्रपटातील प्यार प्यार करते करते या गाण्यावर रश्मीने हा डान्स केला आहे. या गाण्यावर रश्मीचा डान्स पाहिल्यानंतर चाहत्यांना श्रीदेवीची आठवण आली आहे. दरम्यान जुदाई या चित्रपटात अनिल कपूर, श्रीदेवी आणि उर्मिला मातोंडकर मुख्य भूमिकेत होते. तर काही लोकांना रश्मी दिव्या भारती यांच्यासारखी दिसली. रश्मीचा हा डान्स पाहिल्यानंतर काहींनी तिची स्तुती केली आहे.

रश्मी छोट्या पडद्यावर पदार्पण करण्या आधी भोजपूरी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री होती. रश्मी ‘उतरन’ या मालिके व्यतिरिक्त ‘झलक दिखलाजा’, ‘नच बलिए’, ‘खतरो के खिलाडी’ आणि ‘बिग बॉस’ सारख्या अनेक रिअॅलिटी शोमध्ये दिसली आहे. रश्मीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लाखो चाहत्यांनी लाईक्स कमेंट करीत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या