‘प्यार किया तो डरना क्या?’, ओवैसींनी तरुणांना दिला प्रेमविवाहाचा सल्ला

‘प्यार किया तो डरना क्या?’, ओवैसींनी तरुणांना दिला प्रेमविवाहाचा सल्ला

owaisi

नवी दिल्ली : ‘प्यार किया तो डरना क्या? असे म्हणत खासदार असद्दुीन ओवैसी यांनी तरुणांना प्रेमविवाहाचा सल्ला दिला असून मुलीला मुलगा आवडला आणि मुलाला मुलगी आवडली तर लग्न करू शकता. तुम्हाला दोघांनाही एकमेकांसोबत लग्न करायचं असेल तर तुम्ही बिनधास्त लग्न करा, असेही ते एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले आहेत. दरम्यान, यासंबंधित व्हिडिओ एका व्यक्तीने ट्विट केला असून ओवैसी यांनी तो व्हिडिओ रिट्विट केला आहे.

यावेळी बोलतांना ओवैसी म्हणाले की,’दोघांनाही एकमेकांसोबत लग्न करायचे असेल तर त्यांनी जास्त विचार करू नये. मुलगा प्रामाणिक असेल तर बिनधास्त लग्न करावे. पण, लग्न करताना हुंडा घेऊ नका, हा मोलाचा सल्ला देखील औवेसी यांनी तरुणांना दिला. बाईक, दोनशे किलोची बिर्याणी आणि सोन्याची मागणी मुलीच्या आई-वडिलांकडे करू नका. हुंडा घेताना मला काहीही नको. पण, अम्मा म्हणतेय म्हणून हुंडा द्या, असं म्हणणे चुकीचे आहे. कारण संसार तुम्हाला करायचा असतो. तुमच्या अम्माला नाही.’

दरम्यान, यापूर्वी एका कार्यक्रमामध्ये ‘मोदी चीनबद्दल बोलताना नेहमी घाबरतात. मोदी चहामध्ये देखील ‘चिनी’ घालत नाहीत. त्यामधून चीन बाहेर येईल, अशी भीती त्यांना वाटते, अशा मिश्किल टोला देखील ओवैसी यांनी लगावला. तसेच पेट्रोल-डिझेलचे वाढते भाव आणि महागाईबद्दल देखील मोदी एकही शब्द बोलत नाहीत. पाकिस्तानने पुलवामामध्ये हल्ला केला त्यावेळी घरात घुसून मारू, असे मोदी म्हणाले होते. पण, चीनने भारतात घुसखोरी केली असतानाही पंतप्रधान मोदी गप्प बसले आहेत. बिहारमधील लोकांवर हल्ला झाला. पण मोदी एकही शब्द बोलले नाहीत,’ अशी टीका ओवैसी यांनी केली होती.

महत्वाच्या बातम्या