रस्ते दुरुस्ती दिरंगाईबाबत बांधकाम मंत्री नाराज

चंद्रकांत पाटील

सिंधुदुर्गनगरी : राज्यातल्या ग्रामीण भागातील रस्ते चांगल्या दर्जाचे करण्यात येतील. रस्त्यात कुठेही खड्डा नसेल अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांनी दिली. पाटील यांनी शुक्रवारी सावंतवाडी येथे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याशी बंद खोलीत चर्चा केली. रस्ते दुरुस्ती कामात होत असलेल्या दिरंगाईबाबत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.

चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते बांदा लोकोत्सवाचा देखील शुभारंभ झाला.चंद्रकात पाटील यांनी सांवतवाडीत सार्वजनीक बांधकाम विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी जिल्ह्यात होत असलेल्या रस्ते दूरूस्ती कामाची माहीती घेतली. रस्ते दूरूस्तीत होत असलेल्या दिरंगाईबद्दल मंत्री महोदयांनी नाराजी व्यक्त केली आणि रस्त्यात पडलेले खड्डे लवकरात लवकर बुजवण्याची सूचनाही त्यांनी केली. राज्यातील ग्रामीण भागातील ३० हजार कि.मी. चे रस्ते दर्जेदार करणार तसेच गावातल्या महिलांना रोजगार निर्माण उपलब्ध करून देणार असल्याचे पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.

सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह अनेकांनी पाटील यांची सावंतवाडीत भेट घेतली. सावंतवाडीची आढावा बैठक आटोपून चंद्रकांत पाटील बांदा येथे होणाऱ्या लोकोत्सवाला रवाना झाले. लोकोत्सवाच्या निमित्ताने बांदा शहरातून एक भव्य रॅली काढण्यात आली. त्याचा शुभारंभ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कोणतेही काम असो बांदा ग्रा.प. विकासात्मक घडामोडीत पुढे असते अशा शब्दात त्यांनी बांदा ग्रा.प.चे कौतुक केले. गावाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.