१५ डिसेंबरनंतर राज्यातील रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही- चंद्रकांत पाटील

chandrakant-patil

टीम महाराष्ट्र देशा – राज्यात रस्त्यावर कोठेही खड्डा दाखवा आणि हजार रुपये मिळवा अस जाहीर करणारे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आता १५ डिसेंबरनंतर राज्यातील रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही, अशी ग्वाही दिली आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे बहुतांश रस्ते हे रोजगार हमी योजनेअंतर्गत तयार केल्याने त्यांचा दर्जा चांगला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. कोकणातील रस्ते पावसाळ्यापूर्वी चांगले केले होते, मात्र मुसळधार पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे देखील त्यांनी सांगितले.

Loading...

कार्तिकी एकादशीनिमित्त सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील सोमवारी संध्याकाळी पंढरपूरमध्ये पोहोचले. महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत ९६ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते असून या रस्त्यांवर १५ डिसेंबरनंतर एकही खड्डा दिसणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. पाटील यांनी यापूर्वीही रस्त्यावर खड्डे नसतील, असा दावा केला होता. मात्र यानंतरही राज्यातील रस्त्यांची परिस्थिती सुधारली नाही. त्यामुळे आता तरी चंद्रकांत पाटील दिलेला शब्द पाळणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राणेंना मंत्रिपद,खडसेंच्या समावेशाच्या प्रश्नाला चंद्रकांत पाटलांची बगल
शासकीय महापूजेनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांनी नारायण राणे यांच्या मंत्रिपदाबाबतही भाष्य केले. नारायण राणे यांचा ११ डिसेंबरपूर्वी मंत्रिमंडळात समावेश होईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले. एकनाथ खडसेना मंत्रिमंडळात स्थान मिळणार का असा प्रश्न विचारला असता पाटील म्हणाले, याबाबत पक्षाध्यक्ष आणि मुख्यमंत्री चर्चा करतील. राज्याच्या तिजोरीवर चार लाख कोटींपेक्षा जास्त कर्ज आहे. खर्च वाढला असला तरी उत्पन्न वाढीला मर्यादा आहेत. पण कर्जाचा डोंगर वाढला तरी विकासकामांना कात्री लावणार नाही, असेही ते म्हणालेत.

 

3 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...