CwG 2018 : सिंधू – सायना आमने सामने,भारताचं सुवर्ण-रौप्य निश्चित

टीम महाराष्ट्र देशा- 21 व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये पीव्ही सिंधू आणि सायना नेहवाल यांनी आपापल्या सेमीफायनलमध्ये विजय मिळवत बॅडमिंटनच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. फायनलमध्येआता या दोन्ही भारतीय खेळाडू आमने सामने असणार आहेत आणि आनंदाची बाब म्हणजे भारताचं सुवर्ण आणि रौप्य पदक निश्चित झालं आहे.

सायना नेहवालने सेमीफायनलमध्ये स्कॉटलंडच्या क्रिस्टी गिलमोरला 21-14, 18-21, 21-17 ने पराभूत केले. तर दुसऱ्या बाजूला सिंधूने सहज विजय मिळवला. सिंधूने पहिला सेट 21-18 ने आपल्या नावावर केला तसेच दुसरा सेटही सिंधूने एकतर्फी विजय मिळवला.

दरम्यान,आज बॉक्सिंगमध्ये मेरी कॉमने सुवर्णपदक पटकाविल्यानंतर आता नेमबाज संजीव राजपूत, बॉक्सिंगमध्ये गौरव सोळंकी आणि कुस्तीपटू सुमित मलिकने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. तर नीरज चोप्राने भालाफेकमध्ये सुवर्ण मिळवलं आहे.

भारतीय नेमबाज संजीव राजपूतने पुरूषांच्या 50 मीटर 3 रायफल पोजिशनमध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे. बॉक्सिंगप्रकारात गौरव सोळंकीने पुरूषांच्या 52 किलोवजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली. उत्तर आयर्लंडचा ब्रेंडन इरविनचा पराभव करत गौरवने भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. तर कुस्तीपटू सुमित मलिकने यशस्वी कामगिरी करत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे. दरम्यान, भारताच्या खात्यात आता एकुण 22 सुवर्णपदकं जमा झाली आहेत.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी