‘अनिधकृत होर्डिंग लावा, हे मी सांगितले नाही; मी नियमांचे पालन करणारा माणूस’

ajit pawar

पुणे : महाराष्ट्रातील दोन दिग्गज नेत्यांचे वाढदिवस एकाच दिवशी येतात. एक म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस. या दोघांचाही वाढदिवस २२ जुलै रोजी असतो. नेत्यांच्या वाढदिवसाची उत्सुकता त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जास्त असते. मोठे होल्डिंग लावणे, रक्तदान शिबीर आयोजित करणे आणि त्यांच्या वाढदिवसाचा केक कापणे, अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम आपण पाहतो.

अशीच होल्डिंग बाजी पुण्यात रंगली आहे. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता फडणवीस आणि पवार यांच्या वाढदिवसाचे शहरात होल्डिंग लावण्यात आले. त्यात फडणवीस समर्थकांनी त्यांना ‘विकासपुरुष’ तर पवार समर्थकांनी त्यांना ‘कारभारी लयभारी’ अशा शब्दाने संबोधले आहे. शहराच्या महत्वाच्या ठिकाणी हे होल्डिंग लावण्यात आले आहेत. या होल्डिंची चर्चा शहरात रंगत आहे. राजकीय वर्तुळात देखील या विषयावर चर्चा होत आहे.

सध्या शहरभर या पोस्टर वॉरची चर्चा रंगली आहे. त्यावर उत्तर देताना अजित पवार चांगलेच भडकले. पत्रकारांकडून अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गुन्हेगारांनीही होर्डिग लावले असल्याचे विचारण्यात आले, त्यावर उत्तर देताना पवार म्हणाले, ‘मी गुन्हेगारांना होर्डिंग लावायला सांगितले होते का? आम्ही आमच्या सदसद्विवेक बुद्धीला स्मरुन आवाहन केले आहे.

जर कोणी काही केले, असेल तर पोलिसांनी कारवाई करावी. त्यांना कधीच बंदी घालण्यात आलेली नाही. अनिधकृत होर्डिंग लावा, हे मी सांगितले नाही. मी नियमांचे पालन करणारा माणूस आहे. जर चूकीची होर्डिंग लागली असतील तर भाजपची येथे सत्ता आहे. तेथील आयुक्तांनी आणि महापौरांनी कारवाई करावी,’ असे अजित पवार म्हणाले.

दरम्यान भाजपकडून एका निवेदनाद्वारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त फलक, बॅनर लावण्यात येऊ नयेत. बॅनर, जाहिराती केल्याचे दिसल्यास पक्षाकडून त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तर वाढदिवसानिमित्त होणारा खर्च टाळून, तो निधी कोरोना नियंत्रणासाठी द्यावा, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP