चावटपणा करणाऱ्याला आतमध्ये टाका; रक्षा खडसेंच्या आक्षेपार्ह उल्लेखावर गुलाबराव पाटील संतापले

जळगाव:- रावेर विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांचा भाजपाच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला आहे. याचा स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

BJP.org ही भाजपची अधिकृत वेबसाईट आहे. सध्या या भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर रक्षा खडसे यांच्या नावापुढे कोणताही आक्षेपार्ह उल्लेख दिसत नाहीये. तो आक्षेपर्ह उल्लेख तत्काळ हटवण्यात आला असल्याची शक्यता आहे.

केवळ महाराष्ट्रातीलच नाही, तर संपूर्ण देशभरातील भाजपच्या सर्व खासदारांची यादी या वेबसाईटवर आहे. जेव्हा रक्षा खडसे यांच्या नावापुढील आक्षेपार्ह उल्लेखाचा स्क्रिनशॉर्ट पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी ट्विटरवर शेअर केला त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. हा सर्व प्रकार गुगल ट्रान्सलेशनमुळे झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासंदर्भात अद्याप भाजापाने अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरम्यान, आता या प्रकरणावर शिवसेनेचे नेते आणि सार्वजनिक पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. असा चावटपणा करणाऱ्याला आतमध्ये टाकायला हवं, अशी संतप्त प्रतिक्रिया पाटील यांनी दिली आहे.

या प्रकारासंदर्भात आपल्याला नुकतीच माहिती मिळाली. हा प्रकार अतिशय संतापजनक आहे. कोणत्याही महिलेच्या विरुद्ध कुणी असे आक्षेपार्ह लिहित असेल, तर त्याची फक्त चौकशीच नव्हे, तर त्याला शिक्षा दिली गेली पाहिजे. कारण महिलेचा सन्मान ठेवणारे आमचे राज्य आणि देशही आहे. त्यामुळे असा चावटपणा करणाऱ्याला आतमध्ये टाकायला हवे, अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या