Share

Ajit Pawar | “कोयता गँगला मोक्का लावा, तडीपार करा”; अजित पवार यांची विधानसभेत मागणी

Ajit Pawar | नागपूर : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी हिवाळी अधिवेशनात कोयता गॅंगचा मुद्दा उपस्थित केला आहे. महाराष्ट्रात, विशेषत: शहरी भागांमध्ये कोयता गँगची दहशत वाढू लागल्याची चिंता अजित पवारांनी विधानसभेत बोलताना व्यक्त केली आहे. राज्याला ‘कोयता गँग’च्या दहशतीतून मुक्त करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

ते म्हणाले, “राज्याच्या विविध भागांत अशा काही घटना घडल्या आहेत. एक कोयता गँग नावाची गँग निर्माण झाली आहे. ते जातात आणि दहशत निर्माण करतात. काचा फोडतात, महिलांना दमदाटी करतात. हॉटेलमध्ये जाऊन खातात, बिलं देत नाहीत. मध्यमवर्गीयांच्या गाड्यांच्या काचा फोडतात. राज्याच्या शहरी भागात हे मोठ्या प्रमाणावर होतंय.”

कोयता गँगचे वाढते लोण रोखण्यासाठी, राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात यावी. त्यासाठी या गँगच्या गुन्हेगारांना मोक्का लावा, तडीपार करा. त्यांची दहशत कोणत्याही परिस्थितीत मोडून काढा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज सभागृहात केली.

“हे कुठल्या पक्षाशी संबंधित नसतात. त्यामुळे यांना पक्ष वगैरे काही नाही. फक्त दहशत निर्माण करणं हा त्यांचा हेतू असतो. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त केला गेलाच पाहिजे. कृपया याची नोंद सरकारने घ्यावी”, असंही अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | नागपूर : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी हिवाळी अधिवेशनात कोयता गॅंगचा मुद्दा उपस्थित केला आहे. …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Nagpur Politics

Join WhatsApp

Join Now