पुसद व उमरखेड़ येथे मोठा अवैध शस्त्रसाठा जप्त. 

संदेश कान्हू, ( जिल्हा प्रतिनिधी )- यवतमाळ. जिल्ह्यतील पुसद काळी दौलतखान व महागाव या ठिकाणाहून मोठा अवैध शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याने एकच खड़बळ उड़ाली आहे. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करत आहेत

मोठा अवैध शस्त्र साठा असल्याची माहिती पुसद शहर पोलिसांना मिळाली . माहितीच्या आधारे आरोपी अबरार अहमद वय ३५ रा पुसद यास ताब्यात घेऊन उमरखेड़ येथील परवेज खान सलीम खान याच्या घराची झाड़ती घेण्यात आली. १२ बोअरचे बंदूक जप्त करण्यात आले तर दोन्ही आरोपींची पोलिस  कोठड़ी रिमांड घेऊन कसुन तपास केले असता त्यांनी दिलेल्या माहिती द्वारे शब्बीर खान रऊफ खान रा काळी दौलतखान याचे घराची झड़ती घेतली त्यात एक बंदूक वन्यप्राणी सांबर शिंग, बंदूकीचे सूट भाग ४ , १२ बोअर नळीची बंदूक जप्त करण्यात आली तार पुसदच्या वसंतनगर मधील अजहर खान सलीम खान एयर रायफल पैलेट, बंदूक कवर , गुप्ती,२ तलवार २खंजर मोठे ,२  लहान चाकू, फायटर जप्त करण्यात आले.

Loading...

उमरखेड येथे एक संशयित इसमाची झडती घेतली असता त्याचे जवळून एक मोठी बंदूक ५ जिवंत काडतुसे एक वापरलेले काडतुसे,३चाकू जप्त करून अटक करण्यात आली. सादर कारवाई पोलीस अधीक्षक यम राजकुमार यांचे मार्गदर्शनात आईपीएस अजय कुमार बंसल व डी वाय एसपी संजय पूजलवार उमरखेड़, पी आय हनुमंत गायकवाड, एपीआई गजेंद्र शिरसागर, गोपाल जाधव, बस्वराज तमशेट्टे नीलेश शेळके, गोपाल वास्टर, मुन्ना आड़े, राहुल कदम, उमरखेडचे  संजय उन्हाळे,महाजन,जगताप यांचे टीम ने करवाई पार पाडली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
सोनियाजींनी सांगितलं शिवसेनेकडून पहिलं हे लिहून घ्या की ...चव्हाणांचा खळबळजनक दावा
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात केवळ दोनच विठ्ठल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'