पुरुषोत्तम भापकर यांची पुण्यात क्रीडा आणि युवक कल्याण आयुक्तपदी बदली

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना राज्य सरकारने प्रशासनात मोठे फेरबदल केले आहेत. गुरुवारी सात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर शुक्रवारी आणखी 13 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. औरंगाबादचे विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांची बदली पुण्यात क्रीडा आणि युवक कल्याण आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. तर भापकर यांच्या जागी क्रीडा, युवक कल्याण आयुक्त सुनील केंद्रेकर यांची नेमणूक झाली आहे.

ठाणे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अभियंता विवेक भीमनवार यांची बदली वर्धा जिल्हाधिकारीपदी झाली आहे. तर आपत्ती व्यवस्थापनाचे संचालक डी. बी. देसाई यांची बदली कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून झाली आहे.

बदली झालेले अधिकारी

पी.एन भापकर
आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, पुणे

अविनाश ढाकणे
जिल्हाधिकारी, जळगाव

Loading...

जी.बी पाटील
सह सचिव, कृषी व पदुम

डी.बी देसाई
जिल्हाधिकारी, कोल्हापूर

Loading...

जितेंद्र डुडी
सहायक जिल्हाधिकारी, नंदुरबार

Loading...

एच मोडक
जिल्हाधिकारी, वाशिम

व्ही.एल भिमनवार
जिल्हाधिकारी, वर्धा

आयुष प्रसाद
मुख्य कार्यकारी अधिकारी, अकोला

विनय गौडा
मुख्य कार्यकारी अधिकारी, नंदूरबार

लक्ष्मीनारायण मिश्रा
आयुक्त, पशुसंवर्धन, पुणे

के.बी उमाप
महासंचालक, मेडा, पुणे

एस.एम केंद्रेकर
विभागीय आयुक्त, औरंगाबाद

शैलेश नवल
जिल्हाधिकारी, अमरावती