हॅशटॅग PuriGandhiFamilyChorHai विरुद्ध EkHiChowkidarChorHai ; सोशल मिडीयावर जोरदार चर्चा

blank

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला जोर पकडला आहे. तर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीका – टिप्पणी , आरोप – प्रत्यारोपच्या फैरी झडताना दिसत आहेत. सध्या ट्वीटर वरती ‘पुरी गांधी फॅॅमिली चोर है’ आणि ‘एक ही चौकिदार चोर है’ असे हॅशटॅग लावत पोस्ट टाकल्या जात आहेत.

सामान्यांचे व्यक्त होण्याचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे सोशल मिडिया, दररोज नवनवीन विषयांची चर्चा होताना दिसते. हॅशटॅग चौकिदार चोर है, मै भी चौकिदार, मै भी बेरोजगार अशा पद्धतीचे हॅशटॅग चा वापर करत सोशल मिडीयावर राजकारण केले जात आहे.