खोटा इतिहास लिहणाऱ्यांना महाराष्ट्रात सुरक्षा घेऊनच फिरावे लागेल – नितेश राणे

पुरंदरेंनी एकट्यानं फिरून दाखवावं, नितेश राणेंची उघड धमकी

औरंगाबाद : बाबासाहेब पुरंदरेंनी महाराष्ट्रात एकटं फिरून दाखवावं, त्यांच्या किती आरत्या आम्ही काढू ते बघा, अशी उघड धमकी काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी दिलीये.तसंच खोटा इतिहास लिहाणाऱ्यांना महाराष्ट्रात सुरक्षा घेऊनच फिरावे लागेल असंही ते पुढे म्हणाले. राणे एवढ्यावर थांबले नाहीतर त्यांनी बाबासाहेब पुरंदरेंचा उल्लेख बाबा पुरंदरे असाही केला. औरंगाबादेत मराठा आरक्षणावर मार्गदर्शनापर भाषणात ते बोलत होते.

मराठा समाजाचा वापर मराठी कलाकारांनी केला. तसाच राजकीय पक्षांनी सुद्धा केला आणि आपल्या झोळ्या भरल्या. मुंबई मोर्चाच्या वेळी मराठी कलाकार आणि राम-शाम कुठे होते असा सवाल उपस्थितीत करत नितेश राणेंनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टोला लगावला.

You might also like
Comments
Loading...