fbpx

एवढा मोठा पुरस्कार मिळेल अस कधी वाटल नव्हतंं : बाबासाहेब पुरंदरे

टीम महारष्ट्र देशा: पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्याला एवढा मोठा पुरस्कार कधी मिळेल अस वाटल नव्हत अशी भावना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर व्यक्त केली.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणाले की, ब्रिटीश राजवटीच्या काळात माझा जन्म झाला असून आज माझे वय 97 आहे. या वयामध्ये देशाच्या राष्ट्रपतींकडून पद्मविभूषण पुरस्कार दिला जाणार आहे. त्यामुळे मी भारावून गेलो आहे. एवढा मोठा पुरस्कार मिळेल असं मला कधी वाटलं नव्हतं. तसेच काल रात्रीच्या सुमारास पद्मविभूषण पुरस्कारसाठी नाव जाहीर झाल्याने मी चकित झालो. तर आजच्या पुरस्कारावेळी आई आणि वडिलांची आठवण येते आहे. तसेच मला ज्या शिक्षकांनी शिकवले त्यांचेदेखील आजपर्यंतच्या वाटचालीमध्ये खूप मोठे योगदान असल्याची भावना पुरंदरेंनी व्यक्त केली.

दरम्यान शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला असून दिल्लीत शुक्रवारी यासंदर्भातील घोषणा करण्यात आली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घरोघरी पोहोचविण्याचे काम केले आहे. याआधी महाराष्ट्र शासनाकडून पुरंदरेना महाराष्ट्रभूषण पुरस्काराने गौरविले आहे.

2 Comments

Click here to post a comment