केंद्रात काम करण्याची संधी पुरंदरनेच दिली – शरद पवार

टीम महाराष्ट्र देशा : निवडणुकीच्या काळात प्रचाराला गेलो नाही तरी पुरंदरने भरभरून प्रेम दिल आहे, पुरंदरमुळेच केंद्रात आणि राज्यात काम करण्याची संधी दिल्याचं विधान राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष खा शरद पवार यांनी केले आहे.

पुण्यामध्ये आयोजित पुरंदर मित्र मंडळाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रम शरद पवार बोलत होते. यावेळी जयसाहेब पुरंदरे याचा अभिष्टचिंतन समारंभ तसेच ‘महाराष्ट्राचे राजकारण’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले करण्यात आले.

निवडणुकीच्या काळात मी कधीही पुरंदरमध्ये प्रचाराला गेलो नाही, तरीही पुरंदरकरांनी प्रेम दिले आहे. सुप्रिया सुळेंनाही पुरंदरमुळेच केंद्रात काम करण्याची संधी मिळाल्याचं यावेळी पवार यांनी सांगितले.

1971 ला दुष्काळ होता म्हणून कुणी रडत बसले नाहीत, अशावेळी कोणी ट्रान्सपोर्ट व्यवसाय टाकला तर कोणी अमृततुल्य काढले . त्यामुळे पुरंदरवासियांची कष्ट करण्याची तयारी कायम असते असे गौरवोद्गार शरद पवार यांनी काढले आहेत.

भारतीय जवानांचे मोठे यश, चार दहशतवाद्यांचा खात्मा

सरकरने पिकांच्या भावात केलीली वाढ म्हणजे निव्वळ धूळफेक – शरद पवार