fbpx

पुरंदर विमानतळाला संरक्षण खात्याकडून ना हरकत

पुरंदर विमानतळ

पुणे , २४ जानेवारी (हिं.स.) – पुणे शहरासाठी प्रस्तावित पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळास संरक्षण खात्याने ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे, अशी माहिती खासदार अनिल शिरोळे यांनी दिली. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणजवळ संरक्षण खात्याने हे प्रमाणपत्र दिले आहे. यासाठी खासदार अनिल शिरोळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले आहे.