पुनवट येथे झालेल्या कार अपघातात एक जण ठार ,४ जखमी

सर्वजण प.बंगालचे रहिवासी

यवतमाळ :- कारच्या भीषण अपघातात 1 ठार चार जखमी

संदेश कान्हू , (जिल्हा प्रतिनिधि) यवतमाळ.

यवतमाळ जिल्ह्यातील वणी जवळील पुनवट येथे झालेल्या कार अपघातात एक जण जागीच ठार झाला असून चार जण जखमी झाले आहे. आज सोमवारी दुपारी ही घटना घडली.

 

मिनारुद्दीन शेख व त्याचे चार सोबती कार क्र एम एच 29 एफ 827 ने चंद्रपूरहून राज्य महामार्गाने वणीला कामा निमित्त  येत होते. दरम्यान कार पलटी झाली. या अपघातात मिनारुद्दीन शेख (वय 20) हा तरुण जागीच ठार झाला. तर त्याच्यासोबत असलेल्या चार जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी चंद्रपूरला हलवण्यात आलं आहे. अपघातातील सर्वजण हे कलकत्ता येथील रहिवासी असून ते चंद्रपूरला डम्पिंग कुलरचं काम करतात. काम घेण्यासाठीच यवतमाळच्या वणी येथे जात असल्याच समजतय. हा अपघात इतका गंभीर होता कि कारचा अक्षरशः चुराडा झाला. अपघात नेमका कसा झाला याचा तपास स्थानिक पोलीस करीत आहे.

You might also like
Comments
Loading...