पंजाबमध्ये ईशनिंदा केल्यास होणार जन्मठेप

टीम महाराष्ट्र देशा – पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आणलेल्या नव्या कायद्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पंजाब सरकारने पंजाबमध्ये पाकिस्ताप्रमाणे ईशनिंदा कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार, राज्यात धार्मिक ग्रंथांची हेटाळणी केली अथवा त्याचा अनादर केल्यास जन्मठेपेची शिक्षा मिळू शकते.

मंगळवारी पंजाब सरकारच्या कॅबिनेटची एक बैठक झाली. या बैठकीत धार्मिक ग्रंथांचा अनादर करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा मिळावी यासाठी भारतीय दंड संहिता (आयपीसी) आणि गुन्हेगारी प्रक्रिया कोड (सीआरपीसी) मध्ये संशोधन करण्याच्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी देण्यात आली.

मुख्यमंत्री अमरिंदर सिंह याचं स्पष्टीकरण :

‘राज्यात धार्मिक ग्रंथांची हेटाळणी व अनादराच्या घटना रोखण्यासाठी आणि दोन समजाती सांप्रदायिक तणाव निर्माण होऊ नये यासाठी हा कायदा आणला असल्याचे म्हटले आहे.’

निष्ठावान व समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड ! – अशोक चव्हाण