आता ड्रग्ज तस्करी केल्यास थेट मृत्युदंडाची शिक्षा

चंदिगढ : तरुणांमधील अंमली पदार्थांची वाढती व्यसनाधीनता रोखण्यासाठी पंजाब सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता ड्रग्जची तस्करी करणाऱ्यांना थेट मृत्युदंड देण्यात यावा असा प्रस्ताव पंजाब सरकारने केंद्राकडे पाठवला आहे.या प्रस्तावाला जर केंद्र सरकारने हिरवा झेंडा दाखवला तर पंजाबमध्ये ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्यांवर अंकुश ठेवता येणं शक्य होणार आहे. पंजाब सरकारच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी सांगितले की, ड्रग्ज तस्करांनी पंजाबच्या तरुणांचे भविष्य बरबाद केले आहे. यासाठी त्यांना कडक शिक्षा मिळायला हवी.’ राज्य नशामुक्त करण्याच्या संकल्पावर पंजाब सरकार ठाम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

यापूर्वी पंजाब सरकारने हत्यारांचे लायसन्स देण्यासाठी अर्जदाराची उत्तेजक चाचणी अनिवार्य केली होती. आणि त्यानंतर आता महत्त्वपूर्ण निर्णय लवकरच लागू करण्याच्या ते तयारीत आहेत. पण आता केंद्र सरकार यावर काय निर्णय देतं याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

पुण्यामध्ये पुन्हा एकदा गुंडाचा हैदोस; 16 गाड्यांच्या काचा फोडल्या

You might also like
Comments
Loading...