चंदीगढ: पंजाबच्या दौऱ्यावर असताना फिरोजपूर येथे पंतप्रधान नरेंद मोदींच्या (PM Narendra Modi) सुरक्षेतील त्रुटीवरून देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप नेत्यांनी कॉंग्रेस तसेच पंजाब सरकारवर चांगलीच टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेत्यांनी देखील भाजपच्या टीकांना प्रत्युत्तर दिले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी देखील पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
दरम्यान पंजाबचे गृहमंत्री सुखजिंदर सिंग (Sukhjindar Singh) यांनीही ट्विट करत, पंजाब आता तुम्हाला माफ करणार नाही, असे वक्तव्यं केले आहे. त्यांच्या या आक्रमक वक्तव्यामुळे त्यांच्या बरखास्तीची मागणी देखील केली जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष अश्विनी शर्मा (Ashwini Sharma) यांनी देखील ट्विट करत म्हणले आहे की, पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्याने पंजाब आता विकास प्रकल्पांपासून वंचित राहिला आहे.
जिसे कर्त्तव्य से ज़्यादा जान की फ़िक्र हो, उसे भारत जैसे देश में बड़ी जिम्मेदारी नहीं लेनी चाहिए !
– सरदार वल्लभभाई पटेल pic.twitter.com/zefpEroVAF
— Charanjit S Channi (@CHARANJITCHANNI) January 7, 2022
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी (Punjab CM Charanjit Singh Channi) यांनी पंतप्रधानांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विधानाचे उदाहरण देत त्यांनी पटेल यांचा फोटो शेअर करत ट्विट केले की, ज्यांना कर्तव्यापेक्षा जिवाची अधिक काळजी आहे त्यांनी भारतासारख्या देशात मोठी जबाबदारी घेऊ नये, असं ट्विट त्यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “गोव्यातील निवडणुकीत पैशांचा पाऊस!”, राऊतांचा रोखठोकमधून गडकरींवर निशाणा
- पुढील चार दिवस महराठवाडा, विदर्भात गारपीटीसह पावसाचा इशारा
- BREAKING: राज्यात नाईट कर्फ्यू, उद्या मध्यरात्रीपासून कडक निर्बंध; जाणून घ्या नवी नियमावली
- आशिष शेलार पाठोपाठ आता कॉंग्रेसच्या ‘या’ नेत्याला जीवे मारण्याची धमकी
- ‘एक भीड का हिस्सा बनता, दुसरा भीड से भागता’; यशोमती ठाकूर यांची पंतप्रधानांवर टीका
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<