झाडांच्या वेदनेवर तरुणाईची फुंकर

nail free tree

पुणे: अंघोळीची गोळी संस्थेतर्फे पुणे शहरात खिळेमुक्त झाडे करण्यासाठी एक अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे. खिळेमुक्त झाडे #NailFreeTree #PainFreeTree असे या उपक्रमाचे नाव असुन याद्वारे शहरातील झाडे खिळेमुक्त केली जाणार आहेत.

Loading...

nail

गेले काही आठवडे सुरू असलेल्या या उपक्रमात पहिल्या टप्प्यात जेएम रोडवरील झाडांना खिळेमुक्त केले जाणार आहे. यापाठीमागील मुख्य उद्देश हा शहरात असलेल्या झाडांचे आयुष्य वाढवणे आहे. कारण झाडांना खिळे मारणे, त्यांना दोरी, वाळवी लागणे किंवा तारांनी बांधणे यामुळे त्यांचे आयुष्य कमी होते असे समोर आले आहे. या चळवळीमुळे झाडांच्या वेदना कमी तर होणारच आहेत परंतू स्वच्छ पुणे, सुंदर पुणे या उपक्रमालाही हातभार लागणार आहे असे अंघोळीची गोळी संस्थेतर्फे कळवण्यात आले.

या उपक्रमाबद्दल बोलताना अंघोळीची गोळी संस्थेचे प्रमुख माधव पाटील म्हणाले, “ पुणे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असुन त्याप्रमाणात झाडांची वाढ होताना दिसत नाही. उभी असलेली झाडेही टिकण्यासाठी विशेष प्रयत्न होताना दिसत नाही. झाडांना खिळे मारणे, त्यांना दोरी किंवा तारांनी बांधणे यामुळे त्यांचे आयुष्य कमी होते. याचमुळे आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे. वाळवी लागलेल्या झाडांना फवारणी तर वाळवी लागू नये म्हणून प्रतीबंधात्मक फवारणी करण्यात येणार आहे. अखेर झाडही एक सजीव असुन त्यालाही समजुन घेतले पाहीजे.”

pain free tree

“हा उपक्रम सुरू होवून ३-४ आठवडे झाले आहेत. दर रविवारी सकाळी ७ ते ९ या वेळेत आम्ही हे काम करतो. अंदाजे १८ ते २० सदस्य या उपक्रमात सहभागी होत आहेत.” असेही ते पुढे म्हणाले. रविवारी राबवण्यात आलेल्या उपक्रमावेळी अंघोळीची गोळी संस्थेचे माधव पाटील, शरद बोदगे, सुक्रुत कुलकर्णी, अमोल बोरसे, वर्षा खरमाळे, राजेश मोरे, प्रिती शेलार आणि विकास उगले उपस्थित होते.

अंघोळीची गोळी संस्थेच्या या उपक्रमात ग्रीनलाइफ फाउंडेशन आणि सेवक फाउंडेशन या संस्थाही सहभागी झाल्या आहेत. ज्यांना या उपक्रमात भाग घ्यायचा आहे त्यांनी ८७९६५७२७६६ किंवा ९९७५६६०९२२ या क्रमांकावार संपर्क करण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

2 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...