पुण्यातील या भागातील रहिवाशांना भरावा लागणार अधिक कर

वेबटीम-पुणे शहराची स्मार्ट सिटी या योजनेत निवड झाली आहे.शहरे स्मार्ट करण्यासाठी केंद्र सरकार कडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.असे बोलले जात होते पण,शहरातील अनेक नागरिकांनी या योजनेला विरोध दर्शविला होता.त्यांच्या मते शहरे स्मार्ट झाली तर तिथले खर्च देखील तितकेच वाढतील.

शहरातील औंध,बाणेर,बालेवाडी या विभागात राहणाऱ्यांना नागरिकाना इतर विभागातील नागरीकांना पेक्षा अधिक कर भरावा लागणार आहे.स्मार्ट सिटी योजने अंतर्गत शहराचा आधुनिक पद्धतीने विकास करण्यात येणार आहे.याच योजने अतंर्गत शहरातील काही विशिष्ट भागांना अधिक योजना राबविण्यात येणार आहेत.या अधिक सेवासुविधा करीता औंध,बाणेर,बालेवाडी या भागांची निवड करण्यात आली आहे.

या भागातील नागरिकांना आता यांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.इतर भागातील नागरिकांच्या तुलनेत अधिक कर भरावा लागणार आहे.स्मार्ट सिटी योजने करता सरकार १००० कोटी हून अधिक खर्च करत आहे.यातून नागरिकांना पायाभूत सुविधा पुरविल्या जात आहे.पण हा निधी पुरेसा नाही जर त्यांची देखभाल ठेवण्यासाठी आणखी निधीची गरज असल्यामुळे या भागातील नागरिकांकडून अधिक कर वसूल केला जात आहे.