Pune Rain | पुणे : सोमवारी दिवसभर पुणे शहारात ढगाळ वातावरण होते. उन्हाचा चटका वाढला होता. त्यामुळे हवेतील उकाडाही वाढल्याचे जाणवत होतं. अशातच रात्री साडे नऊच्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली (Pune Rain Update) आणि क्षणात पावसाचा वेग इतका वाढला की पुणे शहराच्या (Pune City) सरत्यांवरुन पाण्याचे लोंढे वाहू लागले. या पावसाने जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे.
गाड्या वाहून गेल्या-
सोमवारी झालेल्या या पावसात अनेकांच्या गाड्या वाहून गेल्या, शहरात मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी झाडं देखील पडली आहे. रसत्यांवरील पाण्यामुळे एसट्या देखील ठप्प झाल्या. ज्यामुळे अनेक प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागला. कोंढवा खुर्द भाजी मंडई लगत एका ठिकाणी सात नागरिक पाण्यामधे अडकले होते. मंगळवार पेठेतील स्वरुपवर्धिनीजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने एक कुटुंब पाण्यात अडकले होते.
एकूण १२ जणांची सुटका-
कोंढव्यातील येवलेवाडी स्मशानभूमी परिसर, बिबवेवाडी-सुखसागरनगर भागातील अंबामाता मंदिर, कोंढवा परिसरातील एनआयबीएम रस्ता परिसरात पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. अग्निशमन दलाच्या जवानांना या घटनांची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी तातडीने तेथे धाव घेत एकूण १२ जणांची सुटका केली आहे.
पाहा व्हिडीओ –
परतीच्या पावसामुळे पुणे शहरात हाहाकार, झोप उडाल्या, गाड्या देखील वाहून गेल्या, पाहा व्हिडीओ – pic.twitter.com/kL7lWRzFgr
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) October 18, 2022
दरम्यान, नारायण पेठ, सदाशिव पेठ, स्वारगेट, नवी पेठ यासह कात्रज, कोंढवा, कर्वेनगर या उपनगरात जोरदार पाऊस झाला. तसेच बिबवेवाडी परिसरात ढगफुटीसारखा पाऊस झाल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray | “… म्हणून भाजपने माघार घेतली”, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
- Shinde-Fadanvis | “माझ्या जीवाला काही झालं तर शिंदे-फडणवीस जबाबदार”, ठाकरे गटातील खासदाराचा खळबळजनक आरोप
- Sanjay Raut | पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांचा जामीन अर्ज रद्द करावा – ईडीची मागणी
- Grampanchayat Election 2022 | राज्यातील ग्रामपंचायत निडणुकीत कोणी मारली बाजी! शिंदे आणि ठाकरे गटाचे निकाल काय?, वाचा सविस्तर
- Eknath Shinde । अपघाताला कारणीभूत ठरणारे ब्लॅक स्पॉट तातडीने दूर करावेत – एकनाथ शिंदे