‘Every day is Not काक’डे; खा. काकडेंचे भाकीत चुकल्याने पुणेरी पाट्यांतून ‘शालजोडे’

विरेश आंधळकर: भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी गुजरात निकालांवर वर्तवलेले भाकीत चुकीचे ठरल्याने ‘कावळा बसायला अन फांदी तुटायला, ‘Every day is Not काक’डे’ म्हणत अप्रत्यक्षपणे काकडे यांच्यावर पुणेरी स्टाईलने निशाना साधला जात आहे. हे पोस्टर शहरात अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत.  गुजरातमध्ये भाजपचा विजय बिकट असल्याचे वक्तव्य संजय काकडे यांनी केले होते. दरम्यान हे पोस्टर कोणी लावले हे समोर आले नसले, तरी काही ‘मूळ’ उत्साही कार्यकर्त्यांनी हा कारनामा केला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

खासदार काकडे आणि पुणे भाजपमधील नेत्यांमध्ये असणारा कलगीतुरा आता नवीन नाही. दोनच दिवसांपूर्वी शहरातील भाजप नेत्यांचे वाभाडे काढणाऱ्या लेटर बॉम्बमुळे मोठी खळबळ उडाली होती. हे पत्र त्याच्या समर्थकांकडून पाठवण्यात आल्याची चर्चा होती. यामध्ये शहरातील नगरसेवकांपासून मंत्र्यांपर्यंत सगळ्यांचा पर्दाफाश करण्यात आला होता. दरम्यान आता काकडे यांनी केलेलं भाकीत त्यांच्याच गलट येताना दिसत आहे. यातूनच ‘लेटर का बदला पोस्टरसे’ म्हणत ‘Every day is Not काक’डे’ आशयाचे पोस्टर लावले गेल्याच बोलल जात आहे.

माझे भाकीत चुकलेच नाही; मोदींचा करिष्मा ओळखायला चुकलो – संजय काकडे
मी केलेलं भाकीत खोटे ठरलेच नसून मोदींचा करिष्मा झाला तर आम्ही निवडून येऊ हेच म्हंटल होत, तेच चित्र गुजरातमध्ये पहायला मिळाल आहे. गुजरातचा विजय हा भाजपचा नसून केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चमत्कार ओळखायला चुकलो असल्याचं म्हणत भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी आपण केलेलं भाकीत बरोबरच असल्याचं म्हणत स्वतःची पाठराखण केली आहे. तसेच माझ्या समर्थनार्थ भाजपच्या नगरसेवकांना ज्याने कोणी ते पत्र लिहिले आहे,तो निश्चितच माझा हितचिंतक नाही असं सांगत निनावी पत्राच्या प्रकरणात त्यांनी कानावर हात ठेवले आहेत.

You might also like
Comments
Loading...